गाडगे बाबांच्या मतानुसार आज समाजात कर्मवीर भाऊरावांसारख्या माणसांची गरज आहे

आपल्या देशाला धान्याची गरज आहे, पावसाची गरज आहे. पण त्याहीपेक्षा कर्मवीर भाऊरावांसारख्या माणसांची गरज आहे.
    - गाडगे बाबा

आजच्या काळात नेत्यांची वक्तव्ये ऐकली की गाडगे बाबांच्या विचारांची व आचारांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही.

श्री संत गाडगेबाबाविषयी कर्मवीर भाऊराव पाटलांना आदर वाटत असे. बाबा कर्मवीर भाऊराव पाटलांबद्दल म्हणतात, "कर्मवीर भाऊरावांनी शिक्षणाचे काम आरंभिले आहे. गोरगरीब आणि अनाथांची मुले गोळा करून त्यांना ते शिकवितात. त्यांना चहू हाताने मदत केली पाहीजे. हीच देवाची भक्ती आहे. हीच देवाची महापूजा आहे. जे द्रव्य तुम्ही भाऊरावांना द्याल ते सत्कारणी लागेल. आपल्या देशाला धान्याची गरज आहे, पावसाची गरज आहे. पण त्याहीपेक्षा भाऊरावांसारख्या माणसांची गरज आहे. त्यांच्या शिक्षण कार्यावर जनतेनी पैशाचा वर्षाव केला पाहीजे. गाडगे बाबांच्या याच विचारांची आज समाजात गरज आहे. कारण कोणीही येतो आणि शिक्षण क्षेत्रावर आपली अक्कल पाजळून निघून जातो. हे अतिशय भयानक आहे.

कराडच्या कृष्णा कोयनेच्या संगमावर भाऊरावांनी सद्गुरू गाडगे महाराज महाविद्यालय सुरू केले. एकदा गाडगेबाबा तेथे आले. त्यांनी महाविद्यालयाचा परिसर झाडून स्वच्छ केला. गाडगे बाबांचा आणि स्वच्छतेचा संबंध किती जवळचा आहे हे बाबांनी कृतीतून दाखवून दिले. आधी करावे मगच सांगावे. त्यावेळी बाबा म्हणाले, 'भाऊराव पाटील यांनी हयातभर गोरगरीब जनतेची जीवापाड सेवा केली आहे. अडाणी जनतेला तिसरा डोळा दिला आहे. शेतकऱ्याची मुले आता शिकू लागली आहेत. मी फक्त माणसाची सेवा करून त्यांना माणसात आणण्याचा प्रयत्न केला. भाऊरावांनी दगडालाच जीवंत करून त्यात प्राण ओतला. त्याला देवपण आणले. ही खरी सेवा आहे. भाऊराव पाटील हे खरे कर्मवीर आहेत. ते अनाथ, दीन, पंगु मुलांना शिक्षण देऊन माणसात आणतात. शहाणी पिढी तयार करून देश सेवकांची आघाडी उभी करतात. कर्मवीर भाऊरावांसारखे असंख्य रयत सेवक या भारतात जेंव्हा निर्माण होतील तेंव्हाच आपल्या देशाचा खरा उद्धार होईल. या जगात शहाणी माणसे खूप असतात. पण संत तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे त्यांचे असे असते,

'वेदांचा तो अर्थ आम्हासचि ठावा येरानी वहावा भार माथा।।'

वरील विवेचनावरून एका अडाणी माणसास शिक्षणाचे महत्त्व कसे पटले होते हे दिसून येते. शिक्षण हे वाघीणीचे दुध आहे. असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणत. या देशाची सद्य:स्थिती पाहिल्यास सर्वात जास्त अनागोंदी कारभार शिक्षण क्षेत्रात बोकाळला आहे. वास्तविक शिक्षण हे पवित्र क्षेत्र आहे. आणि याच क्षेत्रात दुर्देवाने बेबंदशाही माजली आहे. सरकारी शाळांचे रूपांतर खाजगी शाळांत करून जास्तीत जास्त पैसा कमावण्याचा प्रयत्न समाजात सुरू आहे. यामुळे गरीब व श्रीमंत यांची मुले वेगवेगळ्या शाळांत शिकू लागली आहेत. यातून सामाजिक दरी मोठ्या प्रमाणात तयार होत आहे.

आज शिक्षण व शिक्षक यांच्यावर निव्वळ लोकांना हसविण्यासाठी अगदी खालच्या पातळीवर जाऊन बोलले जात आहे. दुर्दैवाने जबाबदार पदावर कार्यरत व्यक्ती अनेक महान पुरुषांचे दाखले देऊन  शिक्षण क्षेत्रातील खाजगीकरण हे धोरण अधिक सक्षमपणे समाजाच्या गळी उतरविण्याचा प्रयत्न करत आहेत.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, श्री गाडगे महाराज यांनी ज्या डोळसपणाने शिक्षणाकडे पाहिले, तो डोळसपणा हरवत चालल्याने समजातील अनेक शाळा, शिक्षण संस्था मोडकळीस आलेल्या आहेत. ज्या काळात समाजात प्रचंड गरिबी होती, जेव्हा लोकांना शिक्षणाचं महत्त्व काहीच वाटत नव्हतं, तेव्हा महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणात भरीव काम केले. विशेष म्हणजे आज चांगले काम केले, तर पुरस्कार मिळतात. तेव्हा सावित्रीबाई यांच्यावर शेण फेकले गेले. असं असतानाही त्यांनी स्त्री शिक्षणाचा पाया रोवला. गाडगे बाबांनी आश्रमशाळा चालू केल्या. कर्मवीर भाऊराव पाटील व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिक्षणविषयक कार्याचा आदर्श तर जगाला आहे.

एकंदरीत सांगायचे झाले तर समाजात ज्या समस्या आज उद्भवत आहेत, त्यांना कमी करायचे असेल तर समान पातळीवर जाऊन शिक्षण देणे ही काळाची गरज आहे. सरकारी शाळा अधिक सक्षम करून त्यात प्रयोगशीलता आणणे आवश्यक आहे. राज्यकर्ते जेव्हा यादृष्टीने पावलं टाकायला सुरुवात करतील, तेव्हाच देशाची, राज्याची विकासाची गाडी सुरळीत चालेल. अन्यथा लंगडत चालणारं राज्य गरिबांचा बळी दिल्याशिवाय राहणार नाही.

Debuji -The Inspiration


0 comments :

Post a Comment

 

Wikipedia

Search results

My Blog List

About Me

My photo
Pune, Maharashtra, India
I am a freelance writer and love to write basically about Tribal Culture and Tribal History. Even I also like to write about thoughts of Gadge Maharaj. Trekking is my hobby and photography is one of the part of it. Social awareness is a necessity in todays era, so love to talk to the tribal people. Shivaji Maharaj, Birsa Munda, Tantya Mama Bhil, Raghoji Bhangare etc. are my inspirations and Abdul Kalam is my ideal person. I have many friends and everybody is eager to work for our society.

Our Mission

गाडगे बाबांचे विज्ञानवादी व शैक्षणिक विचार समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविणे हे आपले उद्दिष्ट आहे. गाडगे बाबा हे परिवर्तनवादी संत होते आणि त्यांच्या विचारांची आज समाजाला नितांत गरज आहे.

Popular Posts


गाडगे बाबा

गाडगे बाबा म्हणजे अन्याय, अत्याचाराने गांजलेल्या व अंधश्रद्धेत बुडालेल्या शोषित पिडीत समाजाला लोकशिक्षण देणारा लोकशिक्षक होय.

Followers

Contact Form

Name

Email *

Message *

Total Pageviews

Pages

Featured post

संत गाडगेबाबा: द्रष्टा वास्तुनिर्मितीकार

  संत गाडगेबाबा यांनी त्यांच्या काळात समाजप्रबोधनाबरोबरच राज्यातील प्रमुख शहरांत व तीर्थक्षेत्री धर्मशाळा, आश्रमशाळा, नद्यांना घाट, पाणपोया,...

Translate

Books

  • आदिवासी मुलांचे शिक्षण
  • श्री संत गाडगे महाराज - प्रबोधनकार ठाकरे
  • श्री संत गाडगे महाराज
  • लोकशिक्षक गाडगे बाबा

Pages

Followers

External Links