गाडगे बाबा आणि संत तुकडोजी महाराज

आठवणीतले गाडगे बाबा.....

वार्धक्यामुळे गाडगे बाबांची  तब्येत वारंवार बिघडत असे. त्यांना उपचार आणि आरामाची गरज असताना ते कधी स्वस्थ बसत नव्हते. योजलेले कार्यक्रम पार पाडण्यासाठी ते जीवाचा आटापिटा करत असत.

स्वतःच्या आरोग्याची चिंता न करता त्यांचे सुरू असलेले समाजकार्य पाहून तुकडोजी महाराज यांनी गाडगे बाबांना एक पत्र लिहिले होते....

सदर पत्र आजही त्यांच्या हस्ताक्षरात उपलब्ध आहे.

सदर पत्रातील मजकूर गाडगे बाबांच्या विचारांनी प्रेरित झालेल्या लोकांसाठी देत आहे....

॥ श्री गुरूदेव ॥

मुक्काम मोझरी दि. ९/६/१९५४

श्री. पू. ह.भ.प. संत गाडगे महाराज,

यांना सप्रेम जयगुरू,

ऐकलं आहे की आपली प्रकृती बरीच बिघडली आहे, कृपा करून आपण विश्रांती घेऊन नंतर कार्यक्रमाला गेलांत तर, फार बरे होईल. आपल्या स्वार्थाने बोलावयाचे तर आपल्यासारख्या महान् त्यागी, नि:स्पृह व जनहितैषी सेवकाची आजच्या भारताला अत्यंत जरूरी आहे. महाराज, आमच्या मृत्युलोकांत तर कांही अमर कीर्तीचे लोक असतील, त्यांत आपली जागा महत्वाची आहे. आपण जेवढे दिवस अधिक रहाल तेवढी ईश्वराची कृपा समजूं. समाजांत तोंडाची विद्वत्ता सांगणारे लोक बहुत आहेत पण हातांत खराटा घेऊन, लोकांच्या झोपडयांत भाकरी हातांत घेऊन, सडकेवर खाऊन लोकांचे हित करणारे लोक बोटांवर मोजण्याएवढेही नाहीत. तेंव्हा आपण बिमार आहांत असे कळले की, मन दुःखी होते. आम्ही आपले शिष्य वा सांप्रदायी नसलो तरी आपल्या केलेल्या जनता- -जनार्दनाच्या सेवेचं जे आपल्यात तेज, ओज व कळकळ आहे त्याचे आम्ही दास आहोत.

जे जे कोणी धर्माचे, परधर्माचे, जातीचे, विजातीचे लोक हे कार्यवजा अधिकार ठेवतील त्यांना आम्ही देवापेक्षांही मोठे मानूं असा आमचा सिद्धांत आहे. तेंव्हा आपण अधिक दिवस मानवाची सेवा करावी व तसे उदंड आयुष्य ईश्वराने आपणाला द्यावे अशी देवाजवळ प्रार्थना आहे. श्रीपंढरपूरला भेट होईलच. आपल्याजवळील कळकळीच्या व आपल्या आज्ञेने सदैव वागणाऱ्या लोकांचीही धन्य आहे. सर्व मंडळींना माझा जयगुरू.

तुकडयादास

वरील पत्रातील आशय आपणास फार काही शिकवून जातोय. आज सर्व सुविधा असूनही आपल्याच घरातील मंडळी खरंच आपल्या वार्धक्याच्या काळात आपली इतकी आपुलकीने चौकशी करतील का हा प्रश्न मनात आल्याशिवाय राहत नाही.

ना अंगावर नीट कपडे, ना कोणता बँक बॅलन्स पण मनाची श्रीमंती जपलेल्या गाडगे बाबांविषयी लोकांच्या मनात असलेले काळजीवाहू विचार खूप काही सांगून जातात.

- राजू ठोकळ


0 comments :

Post a Comment

 

Wikipedia

Search results

My Blog List

About Me

My photo
Pune, Maharashtra, India
I am a freelance writer and love to write basically about Tribal Culture and Tribal History. Even I also like to write about thoughts of Gadge Maharaj. Trekking is my hobby and photography is one of the part of it. Social awareness is a necessity in todays era, so love to talk to the tribal people. Shivaji Maharaj, Birsa Munda, Tantya Mama Bhil, Raghoji Bhangare etc. are my inspirations and Abdul Kalam is my ideal person. I have many friends and everybody is eager to work for our society.

Our Mission

गाडगे बाबांचे विज्ञानवादी व शैक्षणिक विचार समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविणे हे आपले उद्दिष्ट आहे. गाडगे बाबा हे परिवर्तनवादी संत होते आणि त्यांच्या विचारांची आज समाजाला नितांत गरज आहे.

Popular Posts


गाडगे बाबा

गाडगे बाबा म्हणजे अन्याय, अत्याचाराने गांजलेल्या व अंधश्रद्धेत बुडालेल्या शोषित पिडीत समाजाला लोकशिक्षण देणारा लोकशिक्षक होय.

Followers

Contact Form

Name

Email *

Message *

Total Pageviews

Pages

Featured post

संत गाडगेबाबा: द्रष्टा वास्तुनिर्मितीकार

  संत गाडगेबाबा यांनी त्यांच्या काळात समाजप्रबोधनाबरोबरच राज्यातील प्रमुख शहरांत व तीर्थक्षेत्री धर्मशाळा, आश्रमशाळा, नद्यांना घाट, पाणपोया,...

Translate

Books

  • आदिवासी मुलांचे शिक्षण
  • श्री संत गाडगे महाराज - प्रबोधनकार ठाकरे
  • श्री संत गाडगे महाराज
  • लोकशिक्षक गाडगे बाबा

Pages

Followers

External Links