प्रो. नरेंद्र के. वागळे यांच्या पुढाकारातून आणि सेंटर फॉर साउथ एशियन स्टडीज यांच्या सहकार्याने "महाराष्ट्र: संस्कृती आणि समाज" यावरील पहिली आंतरराष्ट्रीय परिषद टोरंटो विद्यापीठात, १८-२० मार्च १९८४ रोजी आयोजित करण्यात आली होती. कॅनडाच्या सामाजिक विज्ञान आणि मानवता संशोधन परिषदेद्वारे सदर कार्यक्रमास निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. या परिषदेचे चेअरमन म्हणून प्रो.नरेंद्र वागळे हे होते.
या संवाद परिषदेमध्ये विविध विषयांवर सादरीकरण करण्यात आले. यात विशेष म्हणजे एलेनॉर झेलियट, कार्लटन विद्यापीठ, मिनेसोटा यांनी महाराष्ट्रातील पायाभूत संत परंपरेतील संत एकनाथ व श्री गाडगे महाराज यांच्या विचारांवर आधारित रिसर्च पेपरचे सादरीकरण केले होते.
सदर माहिती Maharashtrian Studies Conference, 1984 या पुस्तकात वाचायला मिळाली.
Debuji - The Inspiration
0 comments :
Post a Comment