सुट्टीतील नाविन्यपूर्ण उपक्रम 2022




श्री गाडगे महाराज मिशन, मुंबई संचलित श्री गाडगे महाराज प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा, दाभोण, ता. डहाणू, जि. पालघर येथील विद्यार्थ्यांना मे महिन्याच्या दीर्घ सुट्टीत नाविन्यपूर्ण उपक्रम देण्यात आलेले असून यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या भागातील विविध प्रकारची माहिती गोळा करण्यास मदत होणार आहे.

                                उपक्रम यादी

1) मोठ्या व अनुभवी माणसांकडून वनौषधींची माहिती घेऊन ती संकलित करणे. ( झाडाचे नाव व त्याचे उपयोग वहीत लिहून शक्य असेल तर झाडाचा फोटो काढावा)


2) परिसरातील बँक, दवाखाना, पोलिस स्टेशन, कारखाना, विशेष प्रकल्प यापैकी एका ठिकाणी भेट देऊन माहिती जमवणे.


3) पारंपरिक विवाह समारंभाचे वर्णन लेखी स्वरूपात करणे. ( आदिवासी पद्धतीने जी लग्न होतात त्याचे वर्णन यात करणे अपेक्षित आहे. उदा. धवलेरीकडून चौक काढणे, हळद, लग्न विधी इ.) शक्य असेल तर लग्न प्रसंगाचे व्हिडीओ किंवा फोटो काढून संग्रहित करणे.


4) स्वतःचे गाव व आसपासचे किमान दहा गावे समाविष्ट करून दिशा लक्षात घेऊन नकाशा तयार करणे.


5) टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार करणे.


6) हस्तकला, विणकाम, बांबूकाम, बुरुडकाम व इतर कौशल्य आत्मसात करणे व काही वस्तूंची निर्मिती करून त्याचे संकलन करणे ( वस्तूंचे फोटो काढून ठेवणे )


7) विविध चित्रे व लेखांच्या कात्रणाचा संग्रह करणे. ( यासाठी जुन्या पेपरच्या रद्दीची मदत घेता येईल.)


8) आपल्या आदिवासी भागात जी कंदमुळे किंवा रानभाज्या बनवल्या जातात त्यांच्या पाककृतींची माहिती जमवणे व नोंद करणे. ( एखाद्या आजीला विशेष भाजी बनवायला सांगून त्याचा व्हिडीओ काढू शकता.)


9) परिसरातील विविध पक्षी व प्राणी यांची माहिती जमविणे.


10) पक्षी पाणपोई तयार करणे.


11) बियाण्यांचे चेंडू ( Seedball ) तयार करणे. ( आता आंबे, जांभळं व इतर फळं आपण रानात जाऊन खात असाल, तर त्यांच्या बिया जमवून त्याला बाजूने माती लावून त्याचे बॉल बनवले तर पावसाळ्यात त्यांची लागवड करणे अधिक सोपे जाते.)


12) आपल्या तालुक्याविषयी माहिती जमविणे.


13) पूर्वीच्या काळी घरात अथवा शेतीच्या कामात वापरल्या जाणाऱ्या 100 वस्तू किंवा अवजारांची नावे संकलित करणे. ( आपल्या घरात, गावात जर अशा वस्तू किंवा अवजारे आजही असतील तर त्यांचे फोटो काढून ठेवा)


वरील उपक्रमांपैकी एक उपक्रम विद्यार्थ्यांनी करावा यासाठी शिक्षक मुलांना मदत करत आहेत.


0 comments :

Post a Comment

 

Wikipedia

Search results

My Blog List

About Me

My photo
Pune, Maharashtra, India
I am a freelance writer and love to write basically about Tribal Culture and Tribal History. Even I also like to write about thoughts of Gadge Maharaj. Trekking is my hobby and photography is one of the part of it. Social awareness is a necessity in todays era, so love to talk to the tribal people. Shivaji Maharaj, Birsa Munda, Tantya Mama Bhil, Raghoji Bhangare etc. are my inspirations and Abdul Kalam is my ideal person. I have many friends and everybody is eager to work for our society.

Our Mission

गाडगे बाबांचे विज्ञानवादी व शैक्षणिक विचार समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविणे हे आपले उद्दिष्ट आहे. गाडगे बाबा हे परिवर्तनवादी संत होते आणि त्यांच्या विचारांची आज समाजाला नितांत गरज आहे.

Popular Posts


गाडगे बाबा

गाडगे बाबा म्हणजे अन्याय, अत्याचाराने गांजलेल्या व अंधश्रद्धेत बुडालेल्या शोषित पिडीत समाजाला लोकशिक्षण देणारा लोकशिक्षक होय.

Followers

Contact Form

Name

Email *

Message *

Total Pageviews

Blog Archive

Pages

Featured post

संत गाडगेबाबा: द्रष्टा वास्तुनिर्मितीकार

  संत गाडगेबाबा यांनी त्यांच्या काळात समाजप्रबोधनाबरोबरच राज्यातील प्रमुख शहरांत व तीर्थक्षेत्री धर्मशाळा, आश्रमशाळा, नद्यांना घाट, पाणपोया,...

Translate

Books

  • आदिवासी मुलांचे शिक्षण
  • श्री संत गाडगे महाराज - प्रबोधनकार ठाकरे
  • श्री संत गाडगे महाराज
  • लोकशिक्षक गाडगे बाबा

Pages

Followers

External Links