गाडगे बाबांच्या विचारांचा पक्षी....





पक्षी आजही झाडावरच बसतात. अजून ते माणसावर बसत नाहीत. अजूनही त्यांना माणूस इतका विश्वासू वाटत नसावा. हीच माणसाच्या बुद्धिमत्तेची मर्यादा असावी. त्यात माणसाची शेवटची वेळ कधी येईल आणि कधी तो या जगाचा निरोप घेईल हे देखील अजून कोणाला वर्तवणे शक्य झालेले नाही. असे असताना माणूस म्हणून आपले वर्तन कसे असावे व जगण्याच्या या लढाईत कशाला प्राधान्य द्यावे हे माणसासारख्या बुद्धिमान प्राण्याला उमगलेले नाही हे दुर्दैव आहे. जी माणसं पैशाला व मी पणाला महत्त्व देतात, ती माणसं उतारवयात पश्चाताप करताना अनेकदा दिसून येतात. आपलं आयुष्य व्यर्थ घालवलं याची सल त्यांना शांतपणे मरूही देत नाही आणि जगुही देत नाही. ही वेळ आपल्यावर येऊ नये असे वाटत असेल तर आपण पक्ष्यांप्रमाणे स्वच्छंदी व सामाजिक मूल्यांचे पालन करत जीवन जगले पाहिजे.
गाडगे बाबा जो पर्यंत कौटुंबिक जीवन जगत होते, तो पर्यंत त्यांच्या जीवनातील प्रत्येक गोष्ट ही व्यवस्था हिसकावून घेत होती. त्यांची जमीन देखील त्यांना टिकवता आली नाही. आपली गेलेली जमीन ऐन केन प्रकराने मिळविण्याचा प्रयत्न गाडगे बाबांनी कधी केला नाही. त्यांनी आज पर्यंत झालेला जीवन प्रवास अभ्यासला. त्यातील मर्यादा पारखून बघितल्या. त्यांची सत्यता पडताळून पाहण्यासाठी स्वतःला लोकांकडून शिक्षा करून घेतली. अनेकदा लोकं त्यांना काट्याच्या फांद्या असलेल्या काठीने मारत, तरी देखील गाडगे बाबा त्यावर कधी राग व्यक्त करत नव्हते. उलट रक्ताळलेल्या अंगावरील काटे काढताना जर कोणी विचारलेच काय करत आहे, तर ते हसून उत्तर देत, "पुरण पोळीची चव चाखत आहे." यावरून आपल्या लक्षात येईल की गाडगे बाबांनी आपल्या जीवनातील मर्यादा मोडीत काढण्यासाठी लोकांमध्ये राहून तपश्चर्या केली. ती तत्कालीन काळापर्यंतच्या साधू संतापेक्षा नक्कीच वेगळी होती.
भौतिक सुखातून बाहेर पडण्यासाठी गाडगे बाबांना देखील 10-12 वर्षांचा कालखंड लागला. त्यांना लिहिता वाचता येत नसले तरी संत तुकारामांच्या अभंगातून त्यांनी वास्तविक माणूसपणाच्या मार्गाला अंगिकारले. डेबूजीचा गाडगे बाबा होण्याचा प्रवास आपणास आजही खूप मोठा अध्याय आहे. आपणही आपल्या जीवनाचं सोनं त्यातून धडा घेऊन करू शकतो, परंतु आपण ऐहिक सुखात अडकल्याने गाडगे बाबांच्या या जीवन प्रवासाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष्य करत आहोत. यामुळेच आपला आज प्रगतीचा मार्ग माणूस म्हणून खुंटला आहे. ज्या गावात, तालुक्यात आपण वयाची 30-40 वर्षे राहत आहोत, तिथे लोकं आपला तिरस्कार करत आहेत. आपल्याच घरातील माणसं आपल्याला आमच्यासाठी काय केलं म्हणून दूषणं देत आहेत. उद्याचं भवितव्य आपल्या बँक बॅलन्सवर अवलंबून राहणार असेल तर मला फाटक्या चिंध्यामधला गाडगे बाबा जास्त भावतो. कारण स्वतःच्या खात्यात एक रुपयाही शिल्लक नसताना शेवटच्या मृत्यूसमयी त्यांच्या सोबत भरपूर लोकं सोबत होती आणि आपण जिवंत असतानाही लोकं आपल्याला जवळ करत नाहीत. माणूस म्हणून आपण हे वास्तव स्वीकारून गाडगे बाबांनी दाखवलेल्या मार्गावर चालणे आवश्यक आहे.
गाडगे बाबांच्या विचारांचं भांडवल करून काही लोकं फक्त आपले खिसे भरत असल्याचे दिसत आहे. हे फार दुर्दैवी आहे. गाडगे बाबा खरे तर परिस आहेत आणि त्यांच्या विचारांचा स्पर्श झाल्याने प्रत्येकाच्या जीवनाचे कल्याण होणे आवश्यक आहे. माणूस म्हणून जीवनाच्या कोणत्याही क्षणापर्यंत आपण निर्णय घेऊन परिवर्तन घडवून आणू शकतो. बाबांच्या विचारांचा जयघोष करत आपलं जीवन मौल्यवान बनवू शकतो. त्यासाठी प्रामाणिकपणे उदारता दाखविण्याची गरज आहे. मोहाला कवटाळून न बसता, समाजातील लहान मोठ्या अडचणीत आपलं योगदान देणं गरजेचं आहे. यातूनच खरं तर आपल्या प्रगतीचा मार्ग जाणार आहे. म्हणून गाडगे बाबांच्या विचारांचा पक्षी आपल्या मनावर विराजमान झाला पाहिजे यासाठी माणूस म्हणून आपलं वर्तन असलं पाहिजे.
- Debuji - The Inspiration
( लेख - इंटरनेट )

0 comments :

Post a Comment

 

Wikipedia

Search results

My Blog List

About Me

My photo
Pune, Maharashtra, India
I am a freelance writer and love to write basically about Tribal Culture and Tribal History. Even I also like to write about thoughts of Gadge Maharaj. Trekking is my hobby and photography is one of the part of it. Social awareness is a necessity in todays era, so love to talk to the tribal people. Shivaji Maharaj, Birsa Munda, Tantya Mama Bhil, Raghoji Bhangare etc. are my inspirations and Abdul Kalam is my ideal person. I have many friends and everybody is eager to work for our society.

Our Mission

गाडगे बाबांचे विज्ञानवादी व शैक्षणिक विचार समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविणे हे आपले उद्दिष्ट आहे. गाडगे बाबा हे परिवर्तनवादी संत होते आणि त्यांच्या विचारांची आज समाजाला नितांत गरज आहे.

Popular Posts


गाडगे बाबा

गाडगे बाबा म्हणजे अन्याय, अत्याचाराने गांजलेल्या व अंधश्रद्धेत बुडालेल्या शोषित पिडीत समाजाला लोकशिक्षण देणारा लोकशिक्षक होय.

Followers

Contact Form

Name

Email *

Message *

Total Pageviews

Blog Archive

Pages

Featured post

संत गाडगेबाबा: द्रष्टा वास्तुनिर्मितीकार

  संत गाडगेबाबा यांनी त्यांच्या काळात समाजप्रबोधनाबरोबरच राज्यातील प्रमुख शहरांत व तीर्थक्षेत्री धर्मशाळा, आश्रमशाळा, नद्यांना घाट, पाणपोया,...

Translate

Books

  • आदिवासी मुलांचे शिक्षण
  • श्री संत गाडगे महाराज - प्रबोधनकार ठाकरे
  • श्री संत गाडगे महाराज
  • लोकशिक्षक गाडगे बाबा

Pages

Followers

External Links