एक महानता ...
जी अशिक्षित असूनही शब्दांच्या पलीकडे जाऊन पोहोचली होती.
एक विचार...
जो गरीबांचा उद्धार करण्यासाठी तळमळीने अविरतपणे झटत होता.
एक विज्ञाननिष्ठ...
ज्याने सतत अंधश्रद्धांविरूद्ध लढत तळागाळात 'खरा देव' पोहोचविला.
एक वादळ....
ज्याने महाराष्ट्रात कच-याबरोबर लोकांच्या विचारांची साफसफाई केली.
एक निस्सीम...
ज्याने कधी देवळात पाय न ठेवताही आपल्या आचरणातून देवाची डोळस परिभाषा रूजवली..
एक उपेक्षित ...
ज्याला त्याच्या महान कामाचं श्रेय कमीच मिळालं किंवा त्यालाही ते नकोच होतं..
एक अवलिया...
ज्याने लोकांच्या कल्याणकारी भविष्यासाठी आपल्या 'वाणी आणि करणी'तून समाजउभारणी केली.
एक महान संत...
ज्याच्या विचारांची व आचारांची बुरसटलेल्या - भरकटलेल्या आमच्या समाजास आज खरी गरज आहे.
(कारण जो माणूसच आम्ही विसरलोय..तिथे त्याच्या विचारांची काय कथा !)
।। तीर्थी धोंडा-पाणी । देव रोकडा सज्जनी ।।

0 comments :
Post a Comment