श्री गाडगे महाराज मिशन, मुंबई माहिती
श्री गाडगे महाराज मिशन, मुंबई हि सेवाभावी संस्था आहे. या संस्थेचा
कार्य विस्तार महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांत झालेला आहे. संस्थेचे कार्य मोठे
असून या संस्थेने सन २००० साली आपल्या कार्याची ५० वर्षे पूर्ण केली आहेत. या
काळात संस्थेने आपल्या कार्य विकासासाठी भक्कम अशी व्यवस्था निर्माण केलेली आहे.
संस्थेची स्थापना :
इ.स.
१९५२ मध्ये श्री गाडगे बाबांनी श्री गाडगे महाराज मिशनची स्थापना केली. श्री गाडगे
बाबांचे मिशन स्थापन करण्यापाठीमागे अनेक हेतू होते. गाडगे बाबांनी गृहत्यागानंतर (
इ.स.१९०५ ) समाजसेवा कार्याला सुरुवात केली. इ.स. १९०८ मध्ये सहकारी मंडळींच्या
मदतीने अमरावती जिल्ह्यात पूर्णा नदीकाठी प्रथम घाट बांधला. हि त्यांच्या रचनात्मक
सामाजिक कार्याची सुरुवात होती. त्यानंतर त्यांनी अनेक ठिकाणी गरजेनुसार धर्मशाळा
स्थापन केल्या. अंध-पंगु रोग्यांसाठी सदावर्ते सुरु केली, वृद्धाश्रम सुरु केले,
मुक्या जनावरांसाठी गोरक्षण संस्था चालू केल्या. त्यांनी अशा प्रकारच्या अनेक
संस्था, शाखा-उपशाखा महाराष्ट्रभर सुरु केल्या होत्या. ह्या सर्व संस्था, शाखा-उपशाखांचा
कारभार आपल्या पश्चात व्यवस्थित चालावा, सर्व संस्थांच्या कारभाराचे एक मुख्य
ठिकाण असावे, सर्व शाखांना संस्थात्मक स्वरूप यावे, अशा अनेक उदात्त हेतूने मिशनची
मुंबई या ठिकाणी स्थापना केली. मिशनच्या स्थापनेमुळे संस्थेच्या कार्यास गती मिळाली.
संस्थेचा विस्तार वाढू लागला. असे असताना त्यासाठी कार्यक्षम अशा प्रशासनाची गरज
जाणवू लागली. हि गरज लक्षात घेऊन श्री गाडगे बाबांनी उच्चशिक्षित व्यक्ती आणि
सहकारी मंडळी यांच्या बरोबर चर्चा करून स्वत: मिशनच्या प्रशासनाचा आराखडा तयार
केला. प्रशासनामध्ये विश्वासू व्यक्तींचा समावेश करून त्यांच्याकडे कारभाराची
जबाबदारी सोपवली. स्वत: मात्र मिशनमध्ये कोणतेही अधिकाराचे पद स्वीकारले नाही.
इ.स.१९५२ ते इ.स.१९७२ चे व्यवस्थापन मंडळ :
अध्यक्ष : श्री. अच्युतराव गुलाबराव देशमुख
उपाध्यक्ष : १) श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर
२) श्री. रा. ब. जयंतीलाल मानकर
खजिनदार : श्री. जे.व्ही.जोशी
जनरल सेक्रेटरी : श्री. यशवंत तुकाराम शिंदे
सभासद : १) श्री. जी.डी.तपासे
२) श्री.पी.ए.म्हात्रे
३) श्री.एस.डी.जाधव
४) शेठ दुर्गा
पांडुरंग दुर्गय्या
५) ह.भ.प.कैकाडी
महाराज
६) श्री. विश्वनाथ
वाघ
७) श्री. बबन
महाराज कळसकर
८) श्री. यशवंतराव
माने
९) श्री. एस.बी.
भोजने वकील
१०) श्री. प्रभाकर
गणपतराव जाधव
११) श्री. गुणवंतराव
बा. चराटे
इत्यादी
व्यक्तींची श्री गाडगे बाबांनी मिशनच्या प्रशासनपदी नियुक्ती केली आणि मिशनचा
कारभार या व्यक्तींकडे सोपवला. या व्यक्तींनी मिशनच्या प्रशासनाची धुरा यशस्वीपणे
सांभाळली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मिशनचा कार्यविस्तार केला.
सुरुवातीच्या
कालखंडात मिशनच्या पदाधिका-यांच्या कार्यक्षम प्रशासनामुळे इ.स.१९७२ पर्यंत मिशन
संचलित शाखांची संख्या सुमारे ३७ पर्यंत पोहचली. मिशन संचलित शाखांच्या वाढत्या
संख्येमुळे मिशन प्रशासनात कालानुरूप बदल करणे गरजेचे वाटू लागले. हे बदल
करण्यासाठी मिशनच्या तत्कालीन नेतृत्वाने ( प्रशासनाने ) श्री गाडगे महाराज मिशनची
घटना दुरुस्ती करण्याचे ठरवले. त्यानुसार त्यानुसार सन १९७१ मध्ये घटना दुरुस्तीचा
ठराव संमत करण्यात आला. ह्या ठरावानंतर दिनांक १ जून १९७१ रोजी मिशनच्या मुल घटनेत
दुरुस्ती केली आणि ह्या घटना दुरुस्तीनुसार मिशनचा कारभार चालविला जाईल असे
ठरविण्यात आले. घटना दुरुस्तीमध्ये मिशनच्या प्रशासनाची कार्यक्षमता वाढविण्यासाठी
खालील घटकांचा समावेश केला गेला.
१)
सर्वसाधारण समिती
२)
केंद्रीय कार्यकारी मंडळ
३)
विश्वस्त मंडळ
४)
आश्रयदाता
५)
हितचिंतक
६)
आजीवसेवक, प्रचारक व सेवक
मिशनच्या सन
१९७१ च्या घटना दुरुस्तीनुसार वरील बाबींचा मिशनच्या प्रशासन व्यवस्थेत समावेश करण्यात
येऊन त्यांची निवडपद्धती, कार्ये व त्यांच्यासाठी नियम ठरवून दिले आणि प्रशासनाचा
नवीन आकृतिबंध तयार झाला. या घटना दुरुस्तीनुसार जर मिशनचा कारभार चालत नसेल अथवा
त्यामध्ये गोंधळ निर्माण होऊन श्री गाडगे महाराज मिशनचे विसर्जन झाल्यास काय केले
जाईल याचीही नोंद मिशनच्या घटना दुरुस्तीमध्ये केली आहे.
मिशन संचलित शाखा – उपशाखांचे प्रशासन :
श्री गाडगे महाराज मिशन हि
सेवाभावी संस्था आहे. या संस्थेने आपल्या कार्याचा विस्तार संपूर्ण महाराष्ट्रभर
केलेला आहे. त्यामुळे मिशन संचलित अनेक शाखा-उपशाखा राज्यभर कार्यरत आहेत.
त्यामध्ये धर्मशाळा, आश्रमशाळा, विद्यालये, वृद्धाश्रम, वसतिगृहे, अनाथ बालकाश्रम,
पाळणाघरे, वाचनालये, ज्युनिअर कॉलेज इत्यादींचा समावेश आहे.

0 comments :
Post a Comment