गोष्ट खारघरच्या धर्मशाळेची




परवा अचानक उज्ज्वलाचा फोन आला. ती नेहमीसारखी घाईघाईत म्हणाली, ‘ताई, तुम्ही २१ तारखेला नवी मुंबईला हव्या आहात.’ तिचा शब्द म्हणजे माझ्यासाठी आदेश होता, तोही प्रेमाचा. त्यामुळे नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता. नित्मित्त होते तिच्या एका वेगळ्या उपक्रमाचे. उज्वला हावरे मुंबईतील एक बांधकाम व्यावसायिक आहे. हावरे बिल्डर्स या प्रसिद्ध कंपनीची ती अध्यक्ष आहे.
हा अगदी वेगळाच उपक्रम कसा आकाराला आला त्याची कहाणी मोठी हृद्य आहे. काही दिवसापूर्वी उज्वलाला अमरावतीवरून एका मैत्रिणीचा फोन आला होता. ती म्हणाली, ‘मला खारघर भागात एखादा घर भाड्याने मिळेल का ग?’ उजू म्हणाली, ‘अग नाही, माझ्याकडे घर शिल्लक नाहीये. आम्ही घरे बांधतो आणि लगेच विकून टाकतो.’ ती मैत्रीण काहीशी निराश वाटल्याने उजुने विचारले, ‘कुणाला हवेय घर आणि कशासाठी?’ मैत्रीण म्हणाली, ‘माझ्या जवळच्या नातेवाईकाला कॅन्सर झाला आहे. उपचारासाठी किमान तीन महिने मुंबईत राहावे लागणार आहे. हॉटेलमध्ये शक्य नाही ग. त्यांना परवडणार नाही इतके भाडे. फार महाग असतात मुंबईतील हॉटेल्स!’ उजुला हे ऐकून फार वाईट वाटले. अशा महत्वाच्या प्रसंगी आपण काही मदत करू शकत नाही याची खंत तिच्या मनाला डाचत राहिली.
पण मग तिला अचानक आठवले. खारघरला तिच्या मालकीची एक चार मजली इमारत होती. ती तिने एका शाळेला भाड्याने दिली होती. मात्र लवकरच ती इमारत रिकामी होणार होती.
त्यावेळी तिच्या असेही लक्षात आले की तिची मैत्रीण असलेली यशोमती ठाकूर ही नुकतीच श्री गाडगेबाबा मिशन ची अध्यक्ष झाली आहे, ती राज्याची महिला आणि बाल कल्याण मंत्री आहे. या मिशनच्या धर्मशाळेत अशा पेशंटची राहण्याची सोय होते.तिने यशोमतीला विचारले, ‘माझ्याकडे एक इमारत आहे. मी ती एका शाळेला भाड्याने दिली होती, ती आता मोकळी होणार आहे. ती मी कॅन्सर पेशंट आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी तुमच्या गाडगे बाबा मिशनला देऊन टाकू का? यशोमतीला मुंबईच्या जागांचे भाव माहित होते. ती म्हणाली, ‘उजू, अरे व्वा! तुझी कल्पना खूप चांगली आहे ग पण आमची संस्था एवढे भाडे देऊ शकणार नाही.’ यावर उजू म्हणाली, ‘मी भाडे कुठे मागतेय? गाडगेबाबा माझेही आहेतच की. मी ती इमारत मिशनला विनामूल्य देऊ इच्छिते!’ हे एकूण यशोमती अवाकच झाली!
नवी मुंबई येथील खारघर ह्या भागात मोक्याच्या ठिकाणी असलेली ‘शारदा सदन’ ही इमारत उज्वलाचे पती आणि मुंबईतील प्रसिद्ध हावरे बिल्डरचे मालक कै. श्री. सतीश हावरे यांच्या स्मरणार्थ उज्ज्वलाने गाडगे बाबा मिशनला धर्मशाला चालवण्यासाठी विनामुल्य दिली. तिने तिथे एकावेळी ६२ बेडची उत्तम सुविधा करण्यात करून त्यांना लागणारे फर्निचर आणि इतर सुविधा उपलब्ध करून दिल्या. तिथे येणाऱ्या रुग्णांना पाहताक्षणीच प्रसन्न वाटेल इतकी इमारत छान सजवली आहे. रुग्णासाठी एक अँब्युलंसही तयार ठेवली आहे.
उज्वलाच्या उदारतेने मी स्तिमित झाले! बिल्डर लोक फक्त नफा कमावतात ह्या कल्पनेला तिने केवढा छेद दिला! पतीच्या अनुपस्थित त्याचे नाव मोठे केले. कोट्यावधी किमतीची नवी मुंबईतील जागा विनामुल्य देवून टाकणे हे तिच्या मनाचा केवढा मोठेपणा दर्शवतात हे पाहिले की या मुलीचेही खूप कौतुक वाटते.
‘गाडगेबाबा मिशन’ ही संस्था श्री गाडगे बाबा हयात असताना स्थापन झाली. त्यावेळी मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांनी परळला एक भूखंड दिला होता. तिथे एक धर्मशाळा आहे. १९८४मध्ये मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी एक भूखंड दादरला दिला होता. तिथेही एक धर्मशाळा आहे. खारघर येथे टाटा कॅन्सर हॉस्पिटलने अलीकडेच एक ‘रिसर्च सेंटर’ सुरु केले. त्यामुळे नवी मुंबईत देशभरातून रुग्णाचा ओघ सुरु झाला. आता मुख्यमंत्री, आमदार, नेता असे काहीही नसलेल्या या मराठी मुलीने, आमच्या उज्ज्वलाने, दिलेल्या इमारतीत हे पेशंट आणि त्यांचे नातेवाईक फक्त ५० रुपये देऊन राहू शकतील. त्याना राहण्यासाठी उत्तम बेडची सोयही उज्ज्वलाने करून दिली आहे.
अमरावती येथील संत गाडगेबाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाच्या संस्कारात वाढलेल्या या दोन वर्गमैत्रिणीने हे एवढे मोठे काम किती सहजतेने केले आहे.
यशोमती म्हणाली तेच खरे आहे. पैसे अनेकांकडे असतात पण ते योग्य ठिकाणी दान करण्याची दानत सगळ्याकडे नसते. म्हणून उज्वलाचे खूप कौतुक वाटते.
उज्जवला अशीच पुढे जात रहा. तुझ्यातील संवेदनशील व्यक्ती अशीच नेहमी ताजीतवानी राहू दे. नफ्यातोट्याच्या हिशोबापेक्षा जनसेवेची भाषा तुला जास्त समजते याचा आम्हा सर्वांना खूप अभिमान वाटतो. तू माझी मैत्रीण आहेस आणि यशोमती माझी मानसकन्या आहे या विचाराने माझा उर भरून येत आहे.

पोस्ट सौजन्य :- श्रद्धा बेलसरे मॅडम

0 comments :

Post a Comment

 

Wikipedia

Search results

My Blog List

About Me

My photo
Pune, Maharashtra, India
I am a freelance writer and love to write basically about Tribal Culture and Tribal History. Even I also like to write about thoughts of Gadge Maharaj. Trekking is my hobby and photography is one of the part of it. Social awareness is a necessity in todays era, so love to talk to the tribal people. Shivaji Maharaj, Birsa Munda, Tantya Mama Bhil, Raghoji Bhangare etc. are my inspirations and Abdul Kalam is my ideal person. I have many friends and everybody is eager to work for our society.

Our Mission

गाडगे बाबांचे विज्ञानवादी व शैक्षणिक विचार समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविणे हे आपले उद्दिष्ट आहे. गाडगे बाबा हे परिवर्तनवादी संत होते आणि त्यांच्या विचारांची आज समाजाला नितांत गरज आहे.

Popular Posts


गाडगे बाबा

गाडगे बाबा म्हणजे अन्याय, अत्याचाराने गांजलेल्या व अंधश्रद्धेत बुडालेल्या शोषित पिडीत समाजाला लोकशिक्षण देणारा लोकशिक्षक होय.

Followers

Contact Form

Name

Email *

Message *

Total Pageviews

Blog Archive

Pages

Featured post

संत गाडगेबाबा: द्रष्टा वास्तुनिर्मितीकार

  संत गाडगेबाबा यांनी त्यांच्या काळात समाजप्रबोधनाबरोबरच राज्यातील प्रमुख शहरांत व तीर्थक्षेत्री धर्मशाळा, आश्रमशाळा, नद्यांना घाट, पाणपोया,...

Translate

Books

  • आदिवासी मुलांचे शिक्षण
  • श्री संत गाडगे महाराज - प्रबोधनकार ठाकरे
  • श्री संत गाडगे महाराज
  • लोकशिक्षक गाडगे बाबा

Pages

Followers

External Links